शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर पॅटर्न , गरोदर महिलांसाठी सोनोग्राफी होणार आता सुलभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 01:14 IST

समीर देशपांडे ।कोल्हापूर : प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत मोफत होणारी सोनोग्राफीही आता अधिक सुलभ होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याने ज्या पद्धतीने रेडिओलॉजी अ‍ॅँड इमेजिंग असोसिएशनला सोबत घेऊन ही प्रक्रिया सुलभ केली आहे. त्याच पद्धतीने राज्यभरात कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.गरोदर महिलांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचा एक भाग म्हणून दुसºया व ...

ठळक मुद्देराज्यभरात राबविण्याच्या सूचना, बालकांमधील व्यंगाचे त्वरीत निदान करुन उपचार शक्य प्रत्येक तपासणीमाग डॉक्टरांना २०० रुपयांचे मानधनशासनाच्या वाढीव एकूण ४०० रुपये मानधनावर काम करण्याचा निर्णयकोल्हापूर जिल्ह्यातील १७ खासगी रुग्णालयांमध्ये सोनोग्राफी केली जाणार

समीर देशपांडे ।कोल्हापूर : प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत मोफत होणारी सोनोग्राफीही आता अधिक सुलभ होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याने ज्या पद्धतीने रेडिओलॉजी अ‍ॅँड इमेजिंग असोसिएशनला सोबत घेऊन ही प्रक्रिया सुलभ केली आहे. त्याच पद्धतीने राज्यभरात कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

गरोदर महिलांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचा एक भाग म्हणून दुसºया व तिसºया महिन्यात त्यांची सोनोग्राफी तपासणी करणे आवश्यक असते. ३४ ते ३६ आठवड्यांमध्ये ही तपासणी केल्यास बालकामध्ये असणाºया जन्मत: व्यंगाचे त्वरित निदान होऊन त्यावर उपचारही करता येणे शक्य असते.

याआधी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शक्य होईल त्या डॉक्टरांकडे जाऊन ही सोनोग्राफी तपासणी केली जात होती. त्यासाठी प्रत्येक तपासणीमाग डॉक्टरांना २०० रुपयांचे मानधन दिले जात होते. खासगी पद्धतीने ही तपासणी केल्यास अधिक पैसे घेतले जातात. त्यामुळे या रकमेमध्ये वाढ करण्याचीही मागणी होत होती.

याची दखल घेत जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा शल्यचिकि त्सक डॉ. एल. एस. पाटील, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील यांनी बैठक घेऊन सांगोपांग चर्चा केली. त्यानुसार डेक्कन महाराष्ट्र रेडिओलॉजी अ‍ॅँड इमेजिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. बाळकृष्ण कित्तुरे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. या असोसिएशनच्या सदस्यांनी एकत्र येत शासनाच्या वाढीव एकूण ४०० रुपये मानधनावर काम करण्याचा निर्णय घेतला.

त्याप्रमाणे आता कोल्हापूर जिल्ह्यातील १७ खासगी रुग्णालयांमध्ये सोनोग्राफी केली जाणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तपासणी झाल्यानंतर रुग्णालयांची यादी तसेच सोनोग्राफी करण्याबाबतचे पत्रही दिले जाईल. गरोदर मातांना जिथे सोयीचे असेल तिथे त्यांनी सोनोग्राफी करून घ्यावयाची आहे. यानंतर ४०० रुपयांप्रमाणे त्या-त्या रुग्णालयला रक्कम अदा केली जाणार आहे. याच पद्धतीने राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातील असोसिएशनशी चर्चा करून सोनोग्राफीचे नियोजनकरावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 

याआधी एका सोनोग्राफीसाठी २०० रुपये मानधन दिले जात होते. मात्र आता त्यामध्ये २०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. वास्तविक, या तपासणीसाठी किमान १ हजार रुपये घेतले जातात. मात्र ‘प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियाना’ला सहकार्य करण्यासाठी आमच्या असोसिएशनच्या जिल्ह्यातील १७ सदस्यांनी इतक्या कमी रकमेमध्ये तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.- डॉ. बाळकृष्ण कित्तुरे, अध्यक्ष, डेक्कन महाराष्ट्र रेडिओलॉजिकल अ‍ॅण्ड इमेजिंग असोसिएशन, कोल्हापूर

टॅग्स :medicineऔषधंdoctorडॉक्टर